पावसाळ्याच्या हेल्दी राहण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

पावसाळ्यामध्ये बाहेरील अन्न आणि फास्ट फूड खाणं करा पूर्णपणे बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: पावसाळा जवळपास सर्वांनाच आवडतो. परंतु तो आपल्याबरोबर बर्‍याच समस्या देखील आणतो. या हंगामात, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे आरोग्याची विशेष काळजी या हंगामात घ्यावी लागते. विशेष करून आपण या हंगामात काय खातो हे सर्वात महत्त्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये बाहेरील अन्न आणि फास्ट फूड खाणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे आणि हेल्दी अन्न खाल्लं पाहिजे. या हंगामात आपल्या आहारात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत हे आपण आज बघणार आहोत.

हंगामी फळं

पावसाळ्यात पपई, लीची, सफरचंद, नाशपाती यासारख्या हंगामी फळांचं सेवन करावं. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि शरीराला आवश्यक पोषक पुरवतं. आपण या गोष्टी सहजपणे आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे. जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतं.

लसूण

लसूण एक सुपरफूड आहे, जे चयापचय वाढविण्यासाठी मदत करतं. आपण डाळ, सांबर, रसम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये याचा वापर करू शकता. तुम्ही लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, हळद आहारात वापरू शकता, जे सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांपासून संरक्षण करतं.

कडू पदार्थ खा

आपल्या आहारात मेथी, कडुनिंब, कारलं सारख्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि आपल्याला हंगामी संक्रमणापासून दूर ठेवतं. यात अ, क, बी, खनिजे, लोह, जस्त या जीवनसत्त्वे पोषक असतात. कडुलिंबामध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत जे बर्‍याच रोगांशी लढायला मदत करतात.

दही

दहीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म आहेत. जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात उपस्थित असलेले चांगले बॅक्टेरिया आतडं निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्यानं केवळ ताजंतवानं वाटत नाही, तर पाचन तंत्रही ठीक राहतं आणि पोटाचा त्रासही होत नाही.

मध

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचं सेवन करणं खूप उपयुक्त ठरू शकतं. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसंच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्यानं कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

पाणी

या हंगामात पुरेसं पाणी प्या. पाणी शरीरात उर्जा ठेवतं. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल.

या पावसाळ्यात वर सांगितलेल्या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. आणि हो इतरांनाही सांगा. पुढच्या वेळी पुन्हा भेटू नवीन टीप्ससह. तोवर एन्जॉय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!