Health Tips | ‘या’ गोष्टींबरोबर गुळाचं सेवन करा अन् तंदुरुस्त राहा!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गुळामध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. गुळात असलेले लोह, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात. गुळाचं काही पदार्थांसोबत सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. यामुळे बर्‍याच आजारांपासून संरक्षण होतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय काही खास टिप्स. चला तर मग जाणून घेऊन कोणत्या गोष्टींसोबत गुळाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

गुळ आणि शेंगदाणे

गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुळ आणि शेंगदाणे हे आजारांपासून दूर ठेवतात.

गुळ आणि तीळ

तीळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात असतात. ते शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत. गुळ आणि तीळ यांचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे. आपण रोगांपासून सुरक्षित राहू शकता.

तूप आणि गुळ

तूप आणि गुळाचं सेवन केल्यानं शरीर निरोगी राहतं. या दोघांचं एकत्रित सेवन त्वचेसाठीही खूप चांगलं आहे. खासकरुन हिवाळ्यातील आजारांपासून वाचण्यासाठी गुळ आणि तूप सेवन करणं फायदेशीर ठरतं.

मेथीचे दाणे आणि गुळ

मेथीचे दाणे आणि गुळ यांचं सेवनही खूप फायदेशीर ठरतं. केसांचा त्रास होण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांचं सेवन खूप उपयुक्त आहे.

या सांगितलेल्या टीप्स नक्की करून पहा. नक्की फायदा होईल. आणि हो इतरांसोबतही या टीप्स शेअर करा. पुढच्या वेळी पुन्हा भेटू नवीन टीप्ससह. तोवर एन्जॉय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!