FITNESS TIPS | निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात ठेवा या ९ गोष्टी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”. मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झालं आहे. हिंदीमध्ये ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे जर शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपण लुटू शकतो. आजकाल फिटनेस आणि सौंदर्याबाबत सर्वच जागरूक होताना दिसत आहेत. मात्र धावत्या जीवनशैलीमुळे फिटनेसबाबत जागरूक असूनही व्यायामासाठी पुरेसा वेळ आणि संतुलित आहार घेणं शक्य होतंच असे नाही. यासाठीच जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करून आणि नियमित काही गोष्टी कटाक्षाने करून तुम्ही कसे निरोगी ठेवू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत निरोगी आरोग्यासाठी टिप्स शेअर करीत आहेत.

पहिली टीप आहे सकाळी लवकर उठा

“लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा लाभे” असं म्हटलं जातं. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी लवकर उठण्याची सवय लावली पाहीजे. रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी लवकर उठण्याठी त्रास होतो. यासाठी शक्य असल्यास रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. अगदी पहाटे नाही पण कमीतकमी सकाळी सहा अथवा सातच्या आधी उठण्यासाठी तुम्हाला रात्री कमीतकमी साडे- दहा ते अकरा वाजेपर्यंत झोपावं लागेल. झोपण्याआधी अर्धा तास गॅझेट्स बंद करण्याचा प्रयत्न करा. उशीरापर्यंत लॅपटॉपवर काम करणं अथवा पुस्तक वाचणं टाळा. कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला झोपेचा संदेश मिळत नाही. बेडरूममधील मंद उजेडाचे दिवे लावा अथवा संथ चालीचं संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला झोप लवकर येईल. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि दिवसभर फ्रेश वाटेल.

दुसरी टीप आहे नियमित व्यायाम करा

फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्यासाठी सवय लावावी लागेल. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि फ्रेश होतं. दिवसभरात कितीही कामाचा व्याप असला तरी कमीतकमी पंधरा ते वीस मिनीटे स्वतःच्या निरोगी जीवनासाठी काढणं मुळीच कठीण नाही. यासाठी सकाळी लवकर उठा  आणि वीस ते तीस मिनीटे व्यायाम करा. फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम हा करायलाच हवा. निरोगी जीवनशैलीसाठी चालणे, जॉगिंग, कार्डियक एक्सरसाईज असे व्यायाम करणं फार गरजेचे आहे. केवळ चालणं फिट राहण्यासाठी पुरेसं नाही. पाच दिवसांपैकी तीन दिवस कठीण व्यायाम आणि दोन दिवस हलका व्यायाम करा. ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा अधिक ताण जाणवणार नाही.

तिसरी टीप आहे योगासने आणि प्राणायमाचा सराव

योगासने आणि प्राणायमदेखील फार महत्त्वाचे आहेत. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि प्राणायमामुळे तुमच्या श्वासावरील नियंत्रण वाढते. योगासने आणि प्राणायमामुळे तुमच्या शरीराला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहतो. अशी अनेक योगासनं आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्य समस्या दूर होऊ शकता. मात्र या योगासने आणि प्राणायमाचा सराव हा योग्य तज्ञांच्या देखरेखीखाली करणं गरजेचं आहे.

चौथी टीप आहे ध्यानधारणा

ध्यानधारणा आणि प्रार्थना याचा जीवनावर नेहमीच सुपरिणाम होत असतो. यासाठी दैनदिन जीवनात सकाळी अथवा संध्याकाळी काही मिनीटे ध्यानधारणेसाठी अवश्य काढा. ध्यानधारणेचा संबध थेट तुमच्या मनासोबत जोडला जातो. मन हे एवढं शक्तीशाली आहे की ते तुम्हाला जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त करून देऊ शकतं. मनातील विचारांचा तुमच्या आरोग्यावरदेखील परिणाम होत असतो. शिवाय सकाळी मेडीटेशनमुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश आणि सकारात्मक होते. जर रात्री मेडीटेशन अथवा प्रार्थना केली तर तुम्हाला चांगली झोप मिळते. रात्री गाढ झोप लागल्यामुळेदेखील तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश दिसता ज्याचा परिणाम तुमच्या दिवसभरातील कामावर होत असतो. त्यामुळे नियमित मेडीटेशन आणि प्रार्थना अवश्य करा.

पाचवी टीप आहे सकारात्मक विचार

विचार आपल्या जीवनावर परिणाम करीत असतात. सकारात्मक विचारसरणीमुळे तुम्ही नेहमी फ्रेश राहू शकता. सकारात्मक विचारांचा तुमच्या शरीराप्रमाणेच संपूर्ण व्यक्तिमत्वावरच चांगला परिणाम होतो. सकारात्मक विचार करणारे लोक नेहमी सर्वांना आवडतात. शिवाय सकारात्मक विचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टीच घडतात.

सहावी टीप आहे संतुलित आहार

संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे. सतत जंक फूड आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकते. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. सकाळचा नास्ता करण्यास कधीच टाळाटाळ करू नका. यासाठी तुमचा डाएट करताना तुमचं योग्य पोषण होत आहे का हे अवश्य तपासा. कारण चुकीच्या डाएटमुळे तुमच्या शरीरप्रकृतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

सातवी आणि महत्त्वाची टीप भरपूर पाणी प्या

निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. डिहायड्रेशन झाल्यास तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. निरोगी त्वचेसाठी स्वतःला डायड्रेट ठेवा. डिडायड्रेशनचा थेट प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला देखील भोगावे लागतात. यासाठी सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसं पाणी प्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!