बिस्कीट खाणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर होण्याची संभाव्य शक्यता?

बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड नावाच्या केमिकलचा उपयोग; युरोपामध्ये केलेल्या अभ्यासातून माहिती समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार रोज बिस्कीट खाणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर होण्याची संभाव्या शक्याता जास्त असते. या अभ्यासात त्यांनी एका शहरातील 60 वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटांचा अभ्यास केल्या नंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिस्कीट हे पॉकेट फूड आहे. समोर आलेल्या अभ्यासानुसार बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड नावाचे केमिकल वापरतात. ही दोन्ही रसायने शरिरामध्ये कॅन्सर निर्माण करणारी संप्रेरक निर्माण करातात.

दाखवली जाते खोटी माहिती

युरोपामध्ये केलेल्या अभ्यासानुसार बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइडचे प्रमाण 350 ग्राम प्रति किलो एवढे असावे असे सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा काही कंपन्या नफ्याच्या गणितामध्ये मापामध्ये पाप करतात. भारताता मिळणाऱ्या ओरिओ, मारीना, वफल्स यासारख्या उत्पदनांमध्ये या केमिकलचे प्रमाण जास्त असते.

सोडीअम आणि साखरेचा भडीमार

हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार वेगवेगळ्या प्रकारची 50 ते 60 सॅम्पल गोळा करण्यात आले त्यांमध्ये अढळणाऱ्या पदार्थांमुळे शरिरीतील किडनीवर थेट परिणाम होताना दिसला. यापैकी 27 प्रकारच्या सॅम्पलमध्ये मोठ्या प्रमाणातल सोडीअम आणि साखर आढळली. एवढचं नसून बिस्कीटांच्या पाकिटांवर असणारी प्रथिनांची माहिती देखील खोटी देण्यात आली आहे.

शुगर फ्री बिस्कीटांचे सत्य

या आहवालात अजून काही धक्कादायक माहीत समोर आली. बाजारात विकल जाणाऱ्या बिस्कीटामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ देखील दिसून आले आहे. या मिठीचा थेट परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसतो. शुगर फ्रि बिस्कीटांच्या बबतीत ही गोष्ट अढळून आली.

धक्कादायक परिणाम आला समोर

स्विडनमध्ये केलेल्या अभ्यासामधून आजूनच धक्कादायक वृत्त समोर आले. या संशोधनात त्यांनी ज्या महिला गेली 10 वर्ष बिस्कीट खातात अशा 60,000 महिलांचा अभ्यास केला. या महिलांमधील ज्या स्त्रीया आठवड्यातून 2 ते 3 वेळा बिस्कीट खातात अशा 33 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे. तर ज्या महिला 3 पेक्षा जास्तवेळ बिस्कीट खातात अशा 42 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!