पचनशक्ती, डोळ्यांची नजर मजबूत होण्यासाठी नियमित करा ‘ही’ 5 साधीसोपी योगासने!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यापासून सर्वत्र जगात योग आणि व्यायामाचं महत्व ठळक होऊ लागलेत. बहुतांश लोक निसर्गाच्या सानिध्यात योग करण्याला प्राधान्य देऊ लागलेत. योग ही अशी क्रिया आहे ज्यामुळे माणूस जास्त काळ निरोगी आणि औषधांशिवाय जीवन जगू शकतो. आज आपण डोळ्यांची दृष्टी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी व त्यासंबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगासने पाहणार आहोत.

हलासन आहे डोळ्यांसाठी उपयोगी

हलासन करण्यासाठी पाठीवर झोपा

हात शरीरासह जमिनीवर ठेवा

आता पाय 90 डिग्री वर उचला

हात जमिनीवरच राहू द्या आणि पायांना डोक्याच्या मागे घेऊन जा

कंबर वर उचलत पाय डोक्याच्या मागच्या जमीनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा

या प्रक्रिये मध्ये हाताने आपल्या कंबरेला आधार देत कम्फर्ट ठेवा आणि काही वेळ या मुद्रेत राहा

हे आसन केल्याने तुमच्या डोळ्यांना आणि अन्य अवयवांना सुद्धा नक्कीच फायदा होईल.

अधोमुख श्वानासन सुद्धा आहे डोळ्यांसाठी उपयोगी

अधोमुख श्वानासन मध्ये याची खात्री बाळगा की हात खांद्याच्या खाली आणि गुडघे हिप्स खाली असावेत

हिप्स वर उचला, गुडघे आणि कोपर सरळ ठेवा आणि शरीराची स्थिती इंग्रजी ‘ए’ अक्षरासारखी बनवा

दोन्ही हातांवर दबाव टाका आणि आपल्या खांदे पसरट करा

पायाचे तळवे जमिनीवर ढकलण्याचा प्रयत्न करा, 8 ते 10 वेळा दीर्घ श्वास घ्या

अनेक जाणकार निरोगी डोळ्यांसाठी हा आसनाचा सल्ला देतात.

त्राटक ध्यान

हे डोळ्यांसाठी लाभदायक मानले जाणारे वेगळे आसन आहे.

आपल्या समोर एक दिवा पेटवून ठेवा

हा दिवा डोळ्यांच्या अगदी सरळ रेषेत असावा

जर तुमची उंची 5 फुट असेल तर हा दिवा 5 फुट लांब ठेवा

तुमची जेवढी उंची तेवढा दिवा लांब ठेवा

बसण्यासाठी तुम्ही कोणतीही आरामदायक मुद्रा निवडू शकता

आता दिव्याच्या ज्योतीकडे पाहणे सुरु करा आणि सर्व ध्यान त्यावर केंद्रित करा

लक्ष द्या की ज्योत कशी हलत आहे, या दरम्यान पापण्यांची जास्त उघडझाप करू नका

हे आसन केल्याने डोळ्यांच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम तर मिळतोच पण दृष्टी चांगली होते आणि एकाग्रता देखील वाढते.

पचन सुधारण्यासाठी करा शलभासन

शलभासन करण्यासाठी एक चटई घेऊन पोटावर झोपा

झोपल्यावर तुमची पाठ वरच्या बाजूस आणि पोट खालच्या बाजूस असेल याची खात्री बाळगा

पाय सरळ ठेवा व पायाचे पंजे सरळ आणि वरच्या बाजूस ठेवा

दोन्ही हात सरळ ठेवून मांडीखाली दाबा

डोके आणि चेहरा सरळ ठेवा व एक दीर्घ श्वास घ्या

दोन्ही पाय वर उचला आणि पायांना शक्य तेवढे वरच्या बाजूस घेऊन जा

किमान 20 सेकंद या स्थितीमध्ये राहा व हळूहळू श्वास सोडत पाय खाली घ्या

हे आसन केल्याने तुम्हाला पचनशक्ती सुधारण्यास मोठी मदत मिळेल.

बालासन

बालासन हे शरीराची बिघडलेली पचन यंत्रणा सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आसन आहे

हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसा

पायाच्या बोटांना एकत्र ठेवा आणि दोन गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवा

श्वास घेताना शरीर पुढील बाजूस झुकवा व पोट मांडीपर्यंत घेऊन जा

तुमच्या डोक्याचा चटईला स्पर्श झाला पाहिजे असा प्रयत्न करा व तसेच चटईवर हात समोरच्या दिशेने सरळ पसरा

हे आसन नियमित केल्यास काहीच दिवसांत तुम्हाला फरक दिसून येऊ शकतो. तर मंडळी योग करत राहा आणि निरोगी राहा.

ही सांगितलेली योगासने नक्की करून पहा. नक्की फायदा होईल. आणि हो इतरांनाही सांगा. पुढच्या वेळी पुन्हा भेटू नवीन योगासनांसह. तोवर एन्जॉय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!