पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट; वाचा काय म्हणाला गायक…

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह याची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ज्यावर हनी सिंहने आता आपलं वक्तव्य सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे. हनी सिंहने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, त्यांच्या पत्नी आणि शालिनी तलवार यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. हे संपूर्ण प्रकरण पाहून तो खूप दुःखी झाला. हे सर्व आरोप गंभीर आणि निंदनीय असल्याचे, त्याचं म्हणणं आहे.

हेही वाचाः ‘नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात’

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

या प्रेस नोटमध्ये, रॅपरने लिहिलं की, मी आजपूर्वी कधीही कोणतीही प्रेस नोट जारी केली नाही, कारण त्या वेळी सर्व चर्चा फक्त माझ्याबद्दल होती, अनेक वेळा माझ्याबद्दल चुकीचं मीडिया कव्हरेज झालं होतं, माझ्या गाण्यांबद्दल बोललं जात होतं. माझ्या आरोग्याबद्दलही बरंच काही सांगितले गेलं, पण मी काहीच बोललो नाही. पण यावेळी माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या बहिणीबद्दल बोललं जात आहे, ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली. हे सर्व आरोप जे आमच्यावर लावण्यात आले आहेत, ते फक्त आम्हाला बदनाम करण्यासाठी करण्यात आले आहेत.

हेही वाचाः पोस्टाची भारी योजना; 705 रुपये भरा अन् मॅच्युरिटीवर 17.30 लाख मिळणार

हनी सिंहने या प्रेस नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, मी गेल्या 15 वर्षांपासून या मनोरंजन विश्वाशी संबंधित आहे, मी देशभरातील सर्व कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केलं आहे. माझ्या पत्नीशी असलेल्या माझ्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. एवढंच नाही तर, माझी पत्नी देखील गेल्या दशकभरापासून माझ्या क्रूचा एक भाग आहे. यासह, ती प्रत्येक कार्यक्रम, शूटिंग आणि मीटिंगमध्ये माझ्याबरोबर असते.

हेही वाचाः ALERT! ‘एचडीएफसी’च्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद

चाहत्यांनी चुकीचा निष्कर्ष काढू नयेत!

हनी सिंहने पुढे लिहिली की, मी हे सर्व आरोप चुकीचे समजतो, मी आता याबद्दल जास्त बोलणार नाही. कारण हे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी सत्य बाहेर येण्याची पूर्णपणे वाट पाहत आहे. अशा वेळी, माझ्या सर्व चाहत्यांनी माझ्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढू नयेत, अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की मला न्याय मिळेल आणि सत्याचा विजय होईल. नेहमीप्रमाणे, मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे ज्यांनी मला अधिक मेहनत आणि चांगलं संगीत बनवण्यास प्रेरित केलं.

हेही वाचाः शिवोलीत ४.३० लाखांचे ड्रग्स जप्त

10 कोटींची भरपाई

गायक हनी सिंहने 23 जानेवारी 2011 रोजी शालिनी तलवारसोबत लग्न केलं. शालिनी ही त्याची बालपणीची मैत्रीण असल्याचं म्हटलं जातं. काही मीडिया रिपोर्ट्स असंही सांगत आहेत की, हनी सिंह मूल न झाल्याने डिप्रेशनमध्ये होते. या प्रकरणात शालिनीने हनी सिंहकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. मात्र, आता हनी सिंहला कोर्टासमोर समोर आपली बाजू मांडायची आहे, त्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये 28 ऑगस्टपूर्वी न्यायालयाला त्याचं उत्तर द्यायचं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | AAP | भाजपचे माजी मंत्री महादेव नाईकांचा ‘आप’मध्ये प्रवेश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!