तुफान गाजतंय! अभिमान वाटावा असं कोकणीतलं Unplugged गाणं अजून नाही पाहिलं?

गेल्या काही दिवसांपासून गाणं वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जमाना अनप्लग्ड गाण्यांचा आहे. त्यात एमटीव्ही अनप्लग्डनंतर तर अनेकांनी अनप्लग्ड गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग केलेत. आपल्या कोकणीमध्येही असा एका खास प्रयोग झालाय. या प्रयोगाची चर्चा फक्त राज्यातच नाही तर सर्वदूर पसरली आहे. हे गाणं गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजतंय. तुफान वायरलही झालंय. या गाण्याचे छोटे छोटे क्लिपिंग्स फेसबूक पेज आणि व्हॉट्सअपवर शेअर केलं जातंय.

गाण्याचं नाव आहे FOLK UNPLUGGED | A GOAN FOLK EXPERIMENTAL | KONKANI MUSIC. लोककलेचा मोठा वारसा गोव्याला लाभलेला आहे. याच लोककलेतील वेगवेगळ्या प्रकारची गाणी एकाच माळेत गुंफण्यात आली आहे. त्यातून साकारण्यात आलं आहे गोवन टच असणारं एक खास लोकगीत. हे लोकगीत आहे अनप्लग्ड. विशेष म्हणजे कोकणीत केला गेलेला संगितातील हा प्रयोग सध्या सगळीकडे भाव खाऊन गेलाय.

जागोर, फुगडी, पारंपारीक गाणी, शिमगोत्सवातली गाणी, धालो गीतं असं सगळं एकत्र बांधून साकारण्यात आलेलं गाणं सगळ्यांनाच आकर्षित करतंय. चला तर मग पाहुयात याच गाण्याची ही खास झलक.

पाहा व्हिडीओ-

कोण आहेत गाणं साकारणारे कलाकार?

हे गाणं गायलंय देवेंद्र शिरोडकर, संजना शिरोडकर, प्रणाली म्हाळशी, शांभवी पराडकर, करीश्मा च्यारी, माधवी मडगावकर यांनी. तर या गाण्याला तबल्यावर साथ दिली आहे चेतन च्यारी यानं. आकाश जल्मीने या गाण्यासाठी हार्मोनियम वाजवली आहे. तर रितेश नाईक, तेजस तोरस्करनेही या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. साईराज घाडगेनं बास गिटार वाजवली आहे. गौरव देसाईनं Cajon हे वाद्य वाजवलंय दौलत पालयेकरनं या गाण्याचं मिक्सिंग केलंय. तर इशांक महालेने संकलन केलं असून विधांत कदमनं या गाण्यासाठी असिस्टंट डीओपी म्हणून काम केलंय. साईदीप च्यारीनंही गाण्यात खारीचा वाटा उचललाय. तर प्राची प्रभूगांवकरनं मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केलंय. प्राचीला मदत केली वेदीका च्यारीनं. तर सेट साकारला गौरव देसाई, चेतन च्यारी, आकाश जल्मी, साईराज घाटगे आणि इशांक महालेनं. वास्कोतील रविंद्र भवनात हे गाणं शूट करण्यात आलंय. गौरीश दाभोळकर, तेजस च्यारी आणि लक्ष्मण केरकर यांनीही हे गाणं सुंदर व्हावं म्हणून आपलं योगदान दिलंय. चला तर.. या खास गाण्यासाठी एक शेअर तर बनतोच…

हेही वाचा –

बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात?

प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी

‘बाहुबली’फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!