Video | #Aadhar Trailer | पण सलमान भाई तर आलेच नाही!

नवा सिनेमा येतोय.. ट्रेलर पाहून घ्या!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोना काळ हळूहळू मागे सरु लागलाय. तसा हळूहळू बॉलिवूडही सक्रिय झालाय. काही सिनेमे ऑनलाईनच रिलीज झाले. त्यानंतर आता काहीप्रमाणात २०२१मधील नव्या सिनेमाबाबत उत्सुकता वाढतेय. अशातच बुधवारी एका सिनेमाचा ट्रेलर गाजतोय. ट्विटरवर हा सिनेमा ट्रेंड होतोय. सिनेमाचं नाव आहे… आधार…

सुमन घोष दिग्दर्शित आधार सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर समोर आलाय. त्यामुळे चाहत्यांना या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचं नावा आधार असल्यानं हा सिनेमा आधार कार्डवर आधारीत असणार आहे का, अशी चर्चा रंगली आहे. दिग्गज कलाकारांनी या सिनेमाच महत्त्वाच्या भूमिका वढवल्यात. भारत आणि इंडियातला भेद दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमातून दिग्दर्शकानं केल्याचं पाहायला मिळतंय. आज या सिनेमाचा ट्रेलर समोर आलाय. अजूनही या सिनेमाची झलक पाहिली नसेल.. तर खाल दिलेल्या लिंकवर ट्रेलर तुम्हाला पाहता येऊ शकेल…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!