ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 मुंबईतल्या राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले.
नाटक आणि चित्रपटांमध्ये केलं काम
रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये त्यांमी काम केलं. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही काम केले आहे.
हेही वाचाःमोरजी येथे हॉटेल कर्मचाऱ्याचा समुद्रात बुडून मृत्यू…
21 नोव्हेंबर 1930 रोजी जन्म
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती.
हेही वाचाःआश्वे-मांद्रे येथे पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा नोंद…
पहिली भूमिका
मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली. पन्नासहून अधिक वर्ष नाट्यक्षेत्राची सेवा केल्याबद्दल मुंबईच्या आम्ही गोवेंकर या संस्थेकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.