ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासलं

सीमा देव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्यानं चिंता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्या सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती समोर आली आहे. सीमा देव यांचा मुलगा आणि अभिनेता अंजिक्य देव यांनी ट्विट करत याची माहिती दिली. आपली आई या आजारातून लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन अजिंक्य देव यांनी चाहत्यांना केलंय.

अजिंक्य देव यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की…

माझी आई श्रीमती. सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतोआहोत. तसेच तिच्यावर प्रेम करत असणाऱ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा.

अनेक भूमिका गाजल्या

सुवासिनी, जगाच्या पाठीवर, आनंद अशा अनेक भूमिकांमधून सीमा देव यांनी रसिक प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यांचा मुलगा अंजिक्य देवदेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

सीमा देव यांना झालेला अल्झायमर आजार काय आहे?

वेळोवेळी स्मृती जाणं म्हणजे अल्झायमर. सोप्या भाषेत सांयाचं तर या आजारात माणूस आजारी आहे, असं कुठंच वाटत नाही. मात्र या आजारामुळे माणसाच्या लक्षात काहीच राहत नाही. छोट्या-मोठ्या गोष्टी या आजारामुळे विसरायला होतात. अनेकदा स्मृती जाते. वृद्धापकाळात हा आजार होण्याची शक्यता जात असते. या आजारामुळे हळूहळू माणूस सगळं काही विसरुन जातो. यालाच पूर्ण स्मतिभ्रंश होणं असंही म्हणतात.

अजय देवगण आणि काजोलने या आजारवर एक सिनेमा केला होता. यू मी और हम असं या सिनेमाचं नाव होतं. भारताबाहेर अनेकांनी या आजारवर सिनेमे बनवले आहेत. अवे फ्रॉम हर, द नोटबुक, स्टील माईन इत्यादी सिनेमांतून अल्झायमर आजार किती गंभीर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.