पांडेवर गुन्हा… सोमणचं कौतुक, असं कसं? दिग्दर्शकाच्या ट्वीटनं नवी चर्चा

दोघांनीही केलेलं न्यूड फोटोशूट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पूनमजी पांडे किती बोल्ड आहेत, हे जगाला माहीत आहेच. जगाला सोमणांचा मिलिंद किती फीट आहे, हे ही माहीत आहेच की. पण सध्या चर्चा जी या दोघांबाबत सुरु आहे, ती फारच इंटरेस्टिंग अशी आहे.

काणकोणच्या चापोली धरणावर अश्लिल व्हिडीओ केल्यानं पूनम पांडेला अटक करण्यात आली आहे. यावरु गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी राज्य सरकारवर टीकाही केली.

दोन दिवसांनंतर मिलिंद सोमण यांचाही फोटो तुफान गाजला. पांडेच्या अश्लिल व्हिडीओमध्ये थोडेफार तरी कपडे होते. पण मिलिंद सोमणांनी तर अंगावर एकही वस्त्र परिधान केलेलं नव्हतं. त्यावरुन एका दिग्दर्शकानं खोचक टोला लगावला आहे.

काय आहे टोला?

‘पूनम पांडे आणि मिलिंद सोमण यांनी वाढदिवसानिमित्त फोटोशूट केलं. गोव्यात त्यांनी हे फोटोशूट केलं. यावेळी मिलिंद पूर्णपणे नग्नावस्थेत होता. तर पूनमचं फोटोशूट पूर्णपणे नग्नावस्थेतील नव्हतं. अश्लिलतेप्रकरणी पूनम कायद्याच्या कचाट्यात अडकली. तर 55व्या वर्षीही फिट असलेल्या मिलिंद सोमणचं कौतुक करण्यात आलं. मला वाटतं नग्नावस्थेतील स्त्रीपेक्षा नग्नावस्थेतील पुरुषांवर उदारता दाखवतो’ अशा आशयाचं ट्विट दिग्दर्शक अपूर्वने केलंय. सध्या सोशल मीडियावर या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

ट्वीट करणारा अपूर्व अन्सारी कोण?

अपूर्व अन्साहीने अनेक सिनेमांसाठी काम केलंय. सत्या, शहीद, अलिगड, मेड इन हेवन सारख्या सिनेमांसाठी त्यानं काम केलंय. सिनेदिग्दर्शक, पटकथा लेखन असं कामही त्यानं केलंय. तसंत राष्ट्रीय पुरस्कारानेही त्याला गौरवण्यात आलंय.

हेही वाचा – पंचनामा | पूनम पांडे, पॉर्नोग्राफी आणि आपला गोवा

मिळवा मोबाईलवर थेट अपडेट्स – इथे क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!