‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन

वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने गाठलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.

हेही वाचाः १६ हजार लीटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास भरावे लागणार पूर्ण बिल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधं घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं रुग्णालयाने पुष्टी केली आहे.

हेही वाचाः परदेशी प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहीत नव्हतं की यामुळे त्याचं नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आलं. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचं नाव उंचावलं.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा चार लाखांच्या दिशेने

तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवलं. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केलं. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

हेही वाचाः चांदेल इथल्या शिबिरात 35 जणांचं रक्तदान

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिएलिटी शोचा विजेता आहे. त्यानं ‘सावधान इंडिया’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावलं. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सिद्धार्थ आणि शहनाजची हिट जोडी

कलर्स या हिंदी वाहिनीवरील बिग बॉस 13 या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. या शोमध्ये दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसले होते. त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते. नुकतंच, सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत धमाल मस्ती केली होती.

हा व्हिडिओ पहाः Dangerous | Hyundai20 | मोरजी किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांमध्ये अडकली कार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!