कवी बोरकर यांच्या गाण्याचा आज प्रिमीयर

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: आपल्या अनेक अजरामर कवितांचे देणे ज्यांनी अवघ्या जगाला दिले ते गोव्याच्या भूमीतील कवी पदमश्री बा. भ. बोरकर यांचा आज जन्मदिवस. यानिमित्ताने गोव्यातील प्रसिध्द गायक, संगीतकार अजय नाईक यांची निर्मिती असलेल्या बोरकर यांच्या गाण्याचा प्रिमियर होणार आहे. ‘तुवें दिल्ल्या वोंवळाचो’ या त्यांच्या कोकणी कवितेचे व्हिडीओ गीत अजय नाईक यांनी तयार केले आहे. संकल्पना, संगीत आणि गायन अजय नाईक यांचे आहे. अजय नाईक आणि रिया नागवेकर यांनी ते सादर केले आहे. दिग्दर्शन राजेश सुभाष कारेकर यांचे आहे. सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा आणि संकलन जाॅय मेडे यांचे आहे. वेशभुषा-केशभुषा समीधा नागवेकर यांची आहे. व्हाईस डबिंग आर्ट अॅण्ड कल्चर स्टुडीओ, पणजी येथे करण्यात आले आहे. म्युझिक अॅरेजमेंट, मिक्सिंग आणि मास्टरींग गणेश सातार्डेकर, मंुबई यांनी केले आहे. या गाण्याचा प्रिमियर आपल्या गोवन वार्ता लाईव्ह या चॅनेलवरही पुढील लिंकवर सायंकाळी ५ वाजता पाहता येणार आहे.
हेही वाचा
सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा 2020’ प्रदान