बाकीबाब यांच्या कवितेवरील व्हिडीओ गीताचे शानदार प्रकाशन

संगीतकार-गायक अजय नाईक यांच्या निर्मितीला रसिकांची दाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: बाकीबाब यांच्या ‘तुवें दिल्ल्या वोवळांचो या कवितेवर संगीतकार, गायक अजय नाईक यांनी तयार केलेल्या व्हिडीओ गीताचे एका शानदार सोहळयात, मोठया उत्साहात प्रकाशन पार पडला. ज्येष्ठ कवी, पदमश्री बा. भ. बोरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळयास केंद्रीय साहित्य अकादमी, नवी दिल्ली, तसेच कोकणी सल्लागार समितीचे निमंत्रक डाॅ. भुषण भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळयाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द चित्रकार आणि इन्स्टिटयूट मिर्नेिझस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर होते. पुण्याच्या कवी बोरकर स्मृती समितीच्या विश्वस्त आणि कवी बोरकर यांच्या कन्या श्रीमती मुक्ता अक्शीकर यांचीही सन्माननीय उपस्थिती होती. संगीतकार, गायक अजय नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले होते. तसेच या व्हिडीओ गीताच्या निर्मितीमागील हेतु विषद केला. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, बाकीबाब यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहील्यानंतर व्हिडीओ गीताचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळयानंतर प्रमुख पाहुणे डाॅ. भुषण भावे यांनी मनोगत व्यक्त केले आहे. गोव्याच्या भुमीतील रूपके कवी बोरकर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातुन अजरामर केल्याचे सांगुन ते म्हणाले, भाषेचे सौंदर्य खÚया अर्थाने बोरकरांच्या कवितेत प्रतित होताना दिसते. आज या कवितेचे अतिशच सुंदर आणि तितकेच आशयप्रधान व्हिडीओ गीत अजय नाईक या संवेदनशील कलाकाराने तयार केले आहे. या माध्यमातुन बाकीबाब यांची कविता नव्या पिढीपर्यंत एका प्रभावी माध्यमातुन पोहोचणार आहे.

अध्यक्षीय भाषणात संजय हरमलकर म्हणाले की गोवा ही कलावंतांची भूमी आहे. आजही गोव्याच्या कानाकोपÚयात कलेची आराधना होताना दिसते आहे. मात्र ही कला जतन करणे आणि ती जगभरात पोहोचवण्यासाठी त्याचे डाॅक्युमेंटेशन होण्याची गरज आहे. जगभरातुन गोव्यात आलेल्या पर्यटकांना, कलापे्रमींना या कलाकृती पाहता याव्यात, अशी व्यवस्था सरकारने करण्याची आवश्यकता आहे. अजय नाईक यांच्या या सुंदर व्हिडीओ गीतामुळे बाकीबाब यांचे काव्य आज एका वेगळया माध्यमातुन जगभरात पोहोचत आहे, ही आम्हा सर्व कलाकारांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.

यावेळी श्रीमती मुक्ता अक्शीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या व्हीडीओ गीताच्या निर्मिती प्रक्रीयेत सहभागी कलाकार व तंत्रज्ञ यांचा अजय नाईक यांनी भेटवस्तु देवून सत्कार केला. सोहळयास उपस्थित राहील्याबददल अजय नाईक यांनी आभार मानले.

हेही वाचा

मल्लिकार्जुन महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!