ओटीटीवर पुन्हा मनोरंजनाची सुनामी…

गुन्हेगारीपासून रोमान्स, सस्पेन्सने परिपूर्ण मालिका, सिनेमे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : करोनाच्या काळापासून लोक मनोरंजनासाठी ओटीटीचा अवलंब करू लागले. जे दर्शक त्यांच्या आवडीची सामग्री पाहण्यासाठी ओटीटीकडे वळले आहेत ते त्यांच्या आवडत्या ओटीटी मालिकेच्या पुढील सीझनची वाट पाहत आहेत. त्याच वेळी, चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत आणि चांगला व्यवसाय करतात. अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, झी-५ वर गुन्हेगारीपासून रोमान्स आणि सस्पेन्सपर्यंत अनेक चित्रपट आहेत. तुम्हालाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज बघायला आवडत असतील, तर आम्ही तुमच्यासाठी ओटीटीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार्‍या चित्रपट आणि मालिकांची यादी घेऊन आलो आहोत.
हेही वाचाःकोलवाळमध्ये १.८२ किलो ग्रॅम गांजा जप्त…

‘जामतारा’ सीझन २

नेटफ्लिक्सची लोकप्रिय क्राईम थ्रिलर मालिका ‘जामतारा’ २३ सप्टेंबरपासून तिचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. ‘जामतारा’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे त्याच्या दुसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचाः Land Grabbing Case | ज‌मिनी हडपप्रकरणी राजकुमार मैथीला तिसऱ्यांदा ‘अटक’…

‘कॅट’

कॅट एक क्राईम थ्रिलर आहे, ज्याची कथा पंजाबच्या पार्श्वभूमीशी संबंधित आहे. या मालिकेत गुंड, ड्रग्ज विक्रेते, पोलीस आणि राजकारण यांच्यात अडकलेल्या माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. हे १२ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचाःतब्बल १८ दिवसांनी सापडला पर्यटकाचा मृतदेह…

‘द फॅमिली मॅन’ ३

मनोज बाजपेयी याच्या द फॅमिली मॅन या हिट वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही मालिका यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
हेही वाचाःAccident | कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी…

‘बबली बाउन्सर’

उत्तर भारतातील मूळ ‘बाऊंसर टाउन’, असोला फतेपूरवर आधारित, बबली बाउन्सर डिस्ने प्लस हॉटस्टारवर २३ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचाःAccident | अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू…

‘हुश्श हुश्श’

जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री पाहण्याची आवड असेल, तर २२ सप्टेंबरला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘हुश-हुश’ या वेब सीरिजमध्ये तुम्हाला पूर्ण मनोरंजन मिळेल. या मालिकेद्वारे ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला ओटीटीच्या जगात पाऊल ठेवणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत सोहा अली खान आणि कृतिका कामराही दिसणार आहेत.
हेही वाचा:देवगड पवनचक्की गार्डन येथे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ जप्त…

‘मजा मा’

ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित पुन्हा एकदा ‘मजा मा’ या चित्रपटात ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. माधुरीशिवाय गजराज राव, ऋत्विक भौमिक, शीबा चढ्ढा, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, मल्हार ठकार आणि निनाद कामत हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा:एनआयएचे १३ राज्यांत छापे; पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक…

‘लव्ह यू लोकतंत्र’

‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटाची कथा राजकीय व्यंगचित्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय निहलानी यांनी केले आहे. या चित्रपटात ईशा कोपीकर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर कृष्णा अभिषेक, अली असगर आणि रवी किशन हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा:दिवसभरात केलेल्या कारवाईत सापडले आणखी १० बांगलादेशी घुसखोर…

‘शांताराम’

ही थ्रिलर मालिका त्याच नावाच्या नोबेलवर आधारित आहे. देश सोडून जाणार्‍या एका बँक लुटारूच्या कथेचे अनुसरण करणारी ही मालिका १४ ऑक्टोबर रोजी अॅपल टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:गोव्यातून पळालेल्या, पीएफआयच्या हस्तकाला केरळमधून अटक…

ड्यूड सीझन २

मालिकेच्या पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, आता रस्क मीडिया ड्युड सीझन २ अमेझान मिनी टीव्हीवर २० सप्टेंबरपासून रिलीज झाला आहे.
हेही वाचा:अखेर ‘त्या’ शाळेत नेमली तात्पुरती शिक्षिका…

‘गोविंदा नाम मेरा’

विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात विकीसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. बातम्यांनुसार, हा चित्रपट ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा:संशयित स्टीव्हला न्यायालयाने केला दोन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर…

‘धोखा’ : राउंड द कॉर्नर

अभिनेते आर. माधवन, खुशाली कुमार आणि अपारशक्ती खुराना यांच्या या चित्रपटाने आतापर्यंत ट्रेलरने लोकांना प्रभावित केले आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अपारशक्ती एका दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
हेही वाचा:COW ADOPTION | मुख्यमंत्र्यांनी सिकेरीतील गोशाळेतून दत्तक घेतली गाय …

अतिथी भूतो भव

प्रतीक गांधी, जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा चित्रपट २३ सप्टेंबरला तोही ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर प्रदर्शित होणार आहे. ट्विस्ट अँड टर्नने भरलेला हा चित्रपट खूपच मजेशीर असेल. कारण कॉमेडीच्या माध्यमातून कथा रंजक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा:MARGAO MUNICIPALITY | घनश्याम शिरोडकरांनी दिला पदाचा राजीनामा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!