श्रद्धांजली! संतूरचे सूर हरपले… पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक दिग्गजांनी शिवकुमार शर्मा यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. 

नरेंद्र मोदी यांची पोस्ट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपले संगीत विश्वाचं मोठे नुकसान झालं आहे. त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. त्यांच्यासोबत झालेला संवाद मला अजूनही लक्षात आहे. ओम शांती.’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रख्यात भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पंडित शिवकुमार जी यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जगात लोकप्रिय करण्यात अतुलनीय योगदान दिले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असं मुख्यमंत्री ट्वीट करताना म्हणालेत.

प्रसिद्ध सरोद वादक अमजद अली खान यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानीनं पोस्ट शेअर पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहली आहे. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातच मोठं नुकसान झालं आहे, असं ही विशाल पोस्टमध्ये लिहिलं. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!