आर्चीच्या-परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा

आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सैराट चित्रपट २०१६ साली रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. या चित्रपटाला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. आजही हा चित्रपट व चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटातून आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एका रात्रीत लोकप्रिय झाले. आता त्या दोघांमध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाला आहे. आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. परशा उर्फ आकाश ठोसरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याचा वेगळाच लूक पहायला मिळतो आहे. त्याने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत लिहिले की, निर्भर.

आकाश ठोसरने शेअर केलेला फोटो पाहून त्याच्यात खूप बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. बऱ्याचदा तो फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आकाश ठोसरने सैराटनंतर एफयूः फ्रेंडशिप अनलिमिडेट या चित्रपटात काम केले. हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२ः द वॉर इन द हिल्समध्ये तो झळकला.

नागराज मंजुळे दिग्दर्शित, अमिताभ बच्चन अभिनीत झुंड चित्रपटात आकाश दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखील दिसणार आहे.

हा व्हिडिओ पहाः FRAUD | हॉटेलवर छापा टाकून रॅकेटचा पर्दाफाश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!