25 व्या युरोपियन चित्रपट महोत्सवाला शानदार प्रारंभ !

अर्जुन धस्के | प्रतिनिधी
पणजी : नवीन वर्षाच्या जल्लोषाची चाहूल लागण्यापूर्वी चित्रपट जगताला वेध लागतात ते गोव्यातल्या चित्रपट महोत्सवाचे. यावर्षी कोरोनामुळं जसं पर्यटन हंगामाला ग्रहण लागलं तसं चित्रपट महोत्सवांचं होतंय की काय, अशी भीती असतानाच 25 व्या युरोपियन फिल्म फेस्टिव्हलला शानदार प्रारंभ झालाय. गोव्याच्या इतिहासात प्रथमच हा महोत्सव व्हर्च्युअल पद्धतीनं होतोय.
गोवा मनोरंजन संस्थेतर्फे युरोपीयन युनियनच्या संयुक्त विद्यमाने पाच नोव्हेंबरपासून युरोपीयन चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. महोत्सव 30 नोव्हेबरपर्यंत 25 दिवस चालणार आहे. चित्रपटप्रेमींना या महोत्सवात तब्बल 42 सर्वोत्कृष्ट युरोपीयन चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. नावनोंदणी सर्वांसाठी मोफत आहे. www.euffindia.com या वेबसाईटवर नोंदणी करावी. चित्रपट प्रेमी सर्व 42 चित्रपट आॅनलाईन पाहु शकतील. चित्रपटप्रेमींनी घरबसल्या चित्रपटांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन युरोपीयन युनियनकडुन करण्यात आले आहे.
या महोत्सवात 36 भाषांमधील 42 चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. यात द ग्राउंड बिनित माय फिट, अलोन अॅट माय वेडींग, राउंडस, मारी, स्मगिलंग हेंड्रींग्ज, फोरमॅन व्हर्सेस फोमॅन, कोरकेस हॅमर्स जोल्ड, द लिटल काॅमे्रड, आॅरोरा, अरब लिव्हज, एक्झायल, परी, जिनेसिस, एक्स्ट्रा आॅर्डीनरी, माॅर्टीन इडेन, मेलो मड, इन्वीजिबल, तेल अविव आॅन फायर, इन्स्टींक्ट, काॅर्पस क्रिस्टी, लिसन, वन स्अेप बिहाईंड द सेरापिन, समर रीबॅल्स, डोंट फर्गेट द ब्रिद, ब्युन्युअल, इन द लॅबिरींन्थ आॅफ द टर्टल्स, अॅण्ड दॅन वुई डान्स्ड, बिहाईंड दि हाॅराॅईझन, पर्सोना, अली: फियर इटस दि साॅल, क्लिओ फ्राॅं 5 टु 7, आय न्यु हर वेल, दि एक्सटर्मिनेटींग एन्जल, थ्री कलर्स: ब्ल्यु, लवज आॅफ ए ब्लाॅंड, कार्ट, अप्राजितो, मेघाज डिवोर्स, कुरूत, तुवा इंगुगु, आॅल्मा, हंग्री सिगल, व अ सनी डे या चित्रपटांचा समावेश आहे.