मुक्या प्राण्यांची ‘ती’ झाली अन्नपूर्णा;
तेजस्विनीचा नवरात्री स्पेशल लूक,तिनं शेअर केलाय नवीन पोस्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज देवीच्या रुपातील तिचा पाचवा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये भुतदयेचं दर्शन होताना दिसतय. देवी ज्याप्रमाणे सृष्टीची, माणसांची काळजी घेते त्याचप्रमाणे तिचं पृथ्वीवरील मुक्या जीवांकडेही लक्ष असतं हे या फोटोतून दाखवण्यात आलंय.
तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये अनोख्या पद्धतीने देवीच्या वेशातील फोटो शेअर करते. आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होतेय. ती गेली दोन वर्षं नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवतेय. यंदा ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून या समस्यांवर व्यक्त होताना दिसतेय
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.