नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू

वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच सोशल मिडीयावर शेअर

अंकिता गवस | प्रतिनिधी

ब्युरो: लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजना सुगीचे दिवस आलेत. वेबसीरिजची वाढती लोकप्रियता पाहता बॉलिवूड स्टार्सचाही कल आता वेब सीरिजकडे झुकताना दिसतोय. त्यामुळे प्रेक्षकवर्गही वेबसिरीजकडे वळलाय. 

नवोदित दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केलीये. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच त्याने सोशल मिडीयावर शेअर केलाय. ‘चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट’, ‘चंद्रप्रकाश यादव’ आणि ‘प्रशांत सावंत’ हे या वेबसिरीजची निर्मिती करतायेत. या वेबसिरीजचे सहनिर्माते प्रशांत मधुकर राणे असून शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलीयेत. 

अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, ”ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे. या वेबसिरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा असून, ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी ब-याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केलाय. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी  देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू द्या हीच सदिच्छा.

निर्माते प्रशांत सावंत यांना वेबसिरीजच्या निर्मितीविषयी विचारता ते म्हणाले, निर्माते चंद्रप्रकाश यादव यांच्यामदतीने मी २०१९ साली ‘चंद्र एंटरटेन्टमेंट’ ह्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. गेल्या एका वर्षा पासुन या प्रोडक्शनच्या माध्यमातून काही तरी नविन करण्याचा प्रयत्न चालू होता आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. या नव्या मराठी वेबसीरीज कथेची टिम माझ्या संपर्कात आली. आणि त्यावर मी काम करण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रयत्नात प्रशांत मधुकर राणे यांनी मला मोलाचे सहकार्य केले आणि आम्ही या वर्षाअखेरीस ह्या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू केले.”

या वेबसिरीजचे लेखक अजिंक्य ठाकूर वेबसिरीजच्या शुभारंभाविषयी म्हणतात, ”बऱ्याच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होतोय.आता श्रीं नी मुहूर्तमेढ रोवली आहे म्हटल्यावर पूर्णत्वाला नेण्याची जबादारी ही त्यांचीच राहते. या वेब शोचा लेखक म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा कायम ऋणी राहीन.”

चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत यांची निर्मिती असलेली, तेजस लोखंडे दिग्दर्शित आणि अजिंक्य ठाकूर लिखित या नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू झाले. यात कोणकोणते कलाकार असणारं आहेत याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!