तापसीला भरावा लागला दंड

विना हेल्मेट बाईक चालवणं पडलं महागात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करतेय. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विना हेल्मेट बाईक चालवताना तापसीला दंड भरावा लागला. त्याचा फोटो तापसीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय.

बाईक चालवतानाचा पाठमोरा फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, विना हेल्मेटसाठी दंड भरण्यापूर्वीचा फोटो. आकाश खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारतेय. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तापसी सोशल मीडियावर शेअर करत असते.

या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय

तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’ ‘रन लोला रन’ या चित्रपटांमध्येही झळकणारे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक होतंय.


हेही वाचा

धेंडलो पाव शेणलो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!