‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘टप्पू’ आहे पत्रकार

आता आहे यशस्वी यूट्यूबर

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. खासकरुन बाल कलाकार म्हणून काम करणारा भव्य गांधी (Bhavya Gandhi). त्याची टप्पू ही भूमिका विशेष गाजली होती.

भव्यने तब्बल 8 वर्ष टप्पू हे पात्र साकारल्यानंतर 2018 मध्ये मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. भव्यला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती. भव्यने आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो पत्रकार असल्याचे सांगितले होते. त्याने गुजराती भाषेमध्ये अनेक लेख लिहिले आहेत. त्याने अनेक गुजराती चित्रपटांमध्येदेखील काम केले.

गुजराती फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केल्यानंतर तो गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळल्याचं पाहायला मिळालं. त्यानं ‘पप्पा तामणे नाही समजाय’ या चित्रपटातून गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘बाव ना विचार’ अशा अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं. गुजरातमध्ये भव्यच्या या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. तारक मेहतानंतर भव्य गांधीनं गेल्या वर्षी ‘शादी के सियापे’मध्ये काम करत छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. पण या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

भव्य बनलाय ‘यूट्यूबर’

सध्या भव्य यूट्यूबवर एक टॉक शो करतो. या शोचं नाव ‘Manan Ni Therapy’ आहे. त्याचा हा शो जिओ स्टूडिओच्या यूट्यूब चॅनेलवर सुरु आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!