गरजूंचा ‘मसिहा’ सोनू सूदला कोरोनाची लागण, ट्वीट करुन सोनू म्हणाला की…

समस्या सोडवण्यासाठी आता पहिल्यापेक्षा जास्त वेळ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : कोरोना काळात लाखो गरजवंतांना मदत केल्यानंतर अनेकांच्या मनात घर केलेल्या सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं स्वतःच ही माहिती दिली आहे. सध्या सोनू सूद क्वारंटाईन असून त्याची प्रकृती नीट असल्याचं कळतंय.

ट्वीटटमध्ये काय म्हणाला सोनू?

नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे.

कोरोना काळात अनेकांना मदत

कोरोना काळात जगातील अनेक लोक अडचणीत आले होते. लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली. या काळात सोनू सूदने लोकांना मदतीसाठी हात पुढे केला होता. लाखो लोकांना त्याने कोरोना काळात मदत केली. तसेच आताही तो अनेकांची मदत करतो. अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत करतात.

राजकीय वादाचीही फोडणी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असंख्य मजुरांना घरी पोहोचवल्यामुळे सोनू सूदच्या सामाजिक कार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोनू भविष्यात भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी लगावला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!