सुरांची महाराणी श्रेया घोषालकडे १८२ कोटींची संपत्ती…

तिची सर्वाधिक कमाई होते गाण्यातून

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : बॉलिवुडची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालची एकूण संपत्ती सुमारे २५ मिलियन डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे १८२ कोटी आहे. तिची सर्वाधिक कमाई गाण्यातून होते. ती विविध संगीत रिॲलिटी टीव्ही शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे. ती चित्रपट गाणी, अल्बम, लाइव्ह कॉन्सर्टमधून कमाई करते. गायिका श्रेया घोषालचे मासिक उत्पन्न १ कोटींहून अधिक आणि वार्षिक उत्पन्न १२ कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. बॉलीवूड आणि हिंदी चित्रपट संगीताशिवाय अपूर्ण आहेत. इंडस्ट्रीत असे अनेक मधुर आवाजाचे कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने चित्रपट हिट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंडस्ट्रीत महिला संगीतकारांची कमतरता नसली तरी त्यांच्यामध्ये एक नाव आहे श्रेया घोषाल. तिने अगदी लहान वयातच मोठे स्थान मिळवले आहे. दिग्गज संगीतकारांसोबत काम करून तिने एक उत्कृष्ट चित्रपट कारकीर्द घडवली. बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या गाण्यांना तिने आपला आवाज दिला आहे. श्रेयाने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रसिद्धीसोबतच कोटव्यधीची संपत्ती कमावली आहे. ती आपल्या कुटुंबासह आलिशान घरात राहते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे १०९८ मध्ये जन्मलेली श्रेया घोषाल अतिशय आलिशान जीवनशैली जगते.
हेही वाचाःविजयादशमीला सुरक्षा दलाला मोठे ‘यश’…

श्रेया घोषालची कमाई

२००२ मध्‍ये संजय लीला भन्साळीच्‍या देवदास चित्रपटात आपला आवाज देणाऱ्या श्रेया घोषालने अनेक हिट गाणी दिली, त्यानंतर ती खूप प्रसिद्ध झाली. कोकिळेचा आवाज देणारी बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल एका गाण्यासाठी २०-२५ लाख रुपये घेते. तिची कमाई अरिजित सिंग, नेहा कक्कर आणि सुनिधी चौहान यांच्यापेक्षा जास्त आहे. ती वर्षाला १२ कोटी रुपये कमवते.
हेही वाचा: टी-२० विश्वचषकात बुमराहच्या जागी शमी…

कार कलेक्शन, आलिशान घर

गायिका श्रेया घोषालकडे महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. यात मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सीरिजच्या गाड्यांचा समावेश आहे. श्रेया घोषाल ही बंगालची असली तरी नंतर ती मुंबईत स्थायिक झाली. तिचे एक घर कोलकात्यात तर दुसरे मुंबईत आहे. श्रेयाने तिचे आलिशान घर अतिशय सुंदर पद्धतीने सजवले आहे. श्रेयाचा आवाज ऐकून कल्याणजी-आनंदजी खूप प्रभावित झाले. श्रेयाच्या चांगल्यासाठी आणि संगीताच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांनी तिच्या वडिलांना मुंबईला शिफ्ट होण्याचा सल्लाही दिला. पुढे श्रेया मुंबईत आल्यावर तिने कल्याणजी आनंदजींकडून संगीतातील बारकावे शिकून घेतले. येथे श्रेयाने ॲटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलमधून शिक्षण घेतले आणि एसआयईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
हेही वाचाःभारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे…

अमेरिका करतो विशेष दिवस साजरा

अनेक फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेल्या श्रेया घोषालचे नाव अमेरिकेत एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ओहायो राज्याचे गव्हर्नर ट्रिक स्ट्रिकलँड यांनी २६ जून हा श्रेयाला समर्पित केला आणि तो श्रेया घोषाल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. श्रेया घोषाल डे पहिल्यांदा २०१० मध्ये साजरा करण्यात आला. श्रेया घोषाल ही भारतातील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायिका आहे. तिने १० हून अधिक भाषांमध्ये आपल्या गाण्यांद्वारे आवाज दिला आहे. तिच्या मधुर आवाजासाठी तिने पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळवली आहेत. प्रतिष्ठित मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये तिचा मेणाचा पुतळा देखील आहे, ज्यामुळे ती ही कामगिरी करणारी पहिली भारतीय गायिका बनली आहे.   
हेही वाचाःमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षेसंदर्भात बैठक संपन्न…  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!