शरदच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण

फोटो शेअर करत म्हणाला..

Goan Varta Live | प्रतिनिधी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाने परदेशात चांगली कमाई केलीये. पण भारतीय प्रेक्षकांना चित्रपट फारसा आवडला नाहीये. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेतये. हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटात आणखी एक अभिनेता असल्याचे समोर आलंय. तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रेक्षकांना शरद केळकरची भूमिका प्रचंड आवडलीये. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शरदच्या भूमिकेचे कौतुक केलंय. आता शरद केळकरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केलाय.

‘लक्ष्मी’ या चित्रपटातील शरद केळकरची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झालीये. शरदचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. त्यामुळे त्यांने आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलाय.

आता आमचा परिवार 5 लाखापेक्षा जास्त झालाय. तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता त्याबद्दल तुमचं आभार.असं शरद केळकरनं फोटो शेअर करत म्हटलं.

‘लक्ष्मी’ चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका शरदनं साकारलीये. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.हा चित्रपट पाहणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचे म्हटलं जातं.मात्र चित्रपटातील शरद केळकरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे दिसून येते. दाक्षिणात्य सुपरस्टार राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. चित्रपटावर धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते.एवढचं नाही तर चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आलेलं.

हेही वाचा

टॉम अँड जेरीचं दमदार पुनरागमन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!