२६ एप्रिलपासून राज्यात विज्ञान चित्रपट महोत्सव

नावीन्यपूर्ण उपक्रम: ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या संख्‍येने घेणार सामावून

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवास मंगळवार दि. 26 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध चित्रपटांसोबत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. तळागाळातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्‍यात मोठ्या प्रमाणात सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती गोवा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तसेच महोत्सव आयोजन समितीचे सदस्य सुहास गोडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू व विज्ञान चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. हरिलाल मेनन, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे डॉ. सुंदेश उपस्थित होते.

हेही वाचाःवीज खात्यातील रखडलेले ‘हे’ अर्ज उद्यापर्यंत निकालात काढणार…

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी महोत्सवाचे उदघाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. 2016 पासून हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. मागच्या वर्षी कोरोना काळातही याची सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. यावर्षी शाळा व महाविद्यालये संपूर्णतः सुरू नसल्यामुळे हा उपक्रम थोड्या उशिरा घेतला जात आहे. राज्यातील सर्व भागातून विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

15 मार्चपासून महोत्सवापूर्वीच विविध उपक्रम

‘आझादी का अमृतमहोत्सव’ या संकल्पनेअंतर्गत 15 मार्चपासून महोत्सवापूर्वीच विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध शाळांमध्ये संशोधकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच विज्ञान विषयावरील चित्रपट निर्मितीची कार्यशाळाही संपन्न झाली असून विज्ञान विषयावरील लघुपट स्पर्धाही घेण्यात आली आहे. त्याचे बक्षीस वितरणही महोत्सवात केले जाणार आहे. विज्ञान शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेत राज्यातील 100 शिक्षक सहभागी होणार आहेत. तसेच रोबोटिक्स या विषयावर निवडक 20 शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. डिझाईन थिंकिंग, संशोधकांना ओळखा या कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत. तीन दिवस विविध वैज्ञानिक उपलब्ध असणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!