इयरएन्डला सावनी रविंद्र देणार चाहत्यांना नवं गाणं भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे ‘सावनी रविंद्र’. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. शिवाय तिने इंस्टाग्रामवर २५० के फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
लवकरच नवं गाणं
गायिका सावनी तिच्या चाहत्यांना वर्षाअखेरीस एक सांगितीक भेट देणार आहे. याविषयी ती म्हणते, ”२०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चढउताराचं होतं. या वर्षाचा शेवटं गोडं करण्यासाठी आणि माझ्या सर्व फॅन्ससाठी मी नविन मॅशअप गाणं घेऊन येत आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात माझ्या ऑफिशीअल युट्यूब चॅनेलवर ते गाणं रिलीज होईल. तसेच मी माझ्या युट्यूुब चॅनेलवरून दर महिन्यातून एकदा लाईव्ह जॅमिंग सेशन सुरू करणार आहे. जेणेकरून माझं चाहत्यांप्रतीचं प्रेमं मी व्यक्तं करू शकेन.”
गायिका सावनी रविंद्र तिच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस कोणतं नवं गाणं घेऊन येते, याची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.