अभिनेता संजय दत्तने कॅन्सरवर केली मात

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर खळबळ माजलेली. पण काही दिवसांपूर्वी ” मी कॅन्सरचा पराभव करेन ‘ असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते, आणि आता आपल्या जुवळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी “मी कॅन्सरवर मात करून बरा झालोय” असे सोशल मीडियावर म्हटलंय. त्यामुळे या बातमीनं त्यांचे चाहते खुश होतील असं दिसतंय.
संजूबाबाला कॅन्सर झाल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आता संजय दत्तने कॅन्सरवर मात केल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वींच इम्रान खानचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यामुळे चाहत्यांना संजय दत्तचीही काळजी लागून राहिली होती. मात्र आता संजय दत्तने कॅन्सवर मात केल्यानं सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकलाय.
संजय दत्तने ट्वीटमध्ये म्हटलंय की…
My heart is filled with gratitude as I share this news with all of you today. Thank you 🙏🏻 pic.twitter.com/81sGvWWpoe
— Sanjay Dutt (@duttsanjay) October 21, 2020