अभिनेता सलमान खानसह बहिणीविरोधात पोलिसात तक्रार

चंदीगडमधल्या व्यापाऱ्याची 3 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : अभिनेता सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान-अग्निहोत्री यांच्यावर चंदीगडमध्ये गुन्हा दाखल झालाय. अरूण गुप्ता या व्यापाऱ्यानं आपली 3 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. सलमानच्या ‘बीईंग ह्युमन’चे सीईओ आणि अन्य अधिका-यांनाही यात आरोपी करण्यात आलंय. पोलिसांनी या सर्वांना समन्स पाठवलंय. 13 जुलैपर्यंत हजर राहण्याची सूचना यात केलीय.

अरूण गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की, चंदीगडमध्ये मनीमाजरा इथं ‘बीईंग ह्युमन’चं शोरूम सुरू करण्यासाठी आपल्याकडून 3 कोटी रूपयांची गुंतवणूक करून घेतली. शोरूम सुरू केलं, मात्र नंतर साहित्यच पाठवलं नाही आणि वेबसाईटही खूप दिवसांपासून बंद आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, कंपनीनं त्यांच्या कोणत्याही तक्रारीला साधं उत्तरही दिलं नाही. सलमानच्या कंपनीसोबत लेखी करार असल्याचंही गुप्ता यांनी सांगीतलंय. तक्रारीत गुप्ता असं म्हणताहेत की, बीईंग ह्युमनचा ज्वेलरी ब्रॅंड स्टाईल क्विटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवते. त्यांच्या शोरूमध्ये सगळे प्रॉडक्ट बीईंग हयूमन कंपनीचेच आहेत. गुप्ता यांनी हे शोरूम 2018 ला सुरू केलं. गुप्ता यांनी पोलिसांना एक व्हीडीओही दिलाय, ज्यात बिग बॉस या शोमध्ये सलमान खान स्वत: सांगतोय की बीईंग हयूमनचं शोरूम चंदिगडमध्ये सुरू केलं आहे. सलमानखानसोबत त्यांच्या कुटूंबाचे फोटोही त्यांनी दाखवले. ज्या कंपनीकडं ह्युमन बीईंगची ज्वेलरी सप्लाय करण्याची जबाबदारी होती, ती कंपनी आणि वेबसाईट बंद आहे.
दरम्यान, चंदीगड पोलिस एसपी केतन बन्सल यांनी सांगितलं की, सलमान खान, त्यांची बहीण यांच्यासह कंपनीच्या अधिका-यांनाही समन्स पाठवले असुन 13 जुलैपर्यंत पोलिसात हजर राहण्याची सुचना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वेळेत प्रतिसाद नाही मिळाला आणि पोलिसांना समर्पक उत्तरे नाही मिळाली तर पोलिस कारवाई करू शकतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!