कोरोनामुळे रजनीकांतचा ‘अन्नाथे’ चित्रपट लांबणीवर

चित्रपटातील 8 जणांना कोरोनाची लागणं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: कोविड- 19 ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रजनीकांतचा नवा चित्रपट ‘अन्नाथे’चं चित्रीकरण थांबवण्यात आलेलं. या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालली होती. दरम्यान 8 जणांना कोरोनाची लागणं झाल्या असल्याची माहिती समोर आलीये.

कोरोनाच्या काळात इतर सर्व व्यवसायांसोबत सिने सृष्टीवरही फार प्रभाव पडलाय. गेले कित्येक महिने नाट्यगृह( theatre) आणि चित्रपट शूटिंगवरही बंधने लादण्यात आली होती. वेळ बदलताच सगळं स्थिरस्थावर आलं खरं. मात्र अजूनही कोरोनाची भिती पूर्णपणे गेलेली नाही. आजही चित्रीकरण करत असताना अनेक जण कोरोनाने संक्रमित झाल्याचं आढळतं आणि चित्रपटांचं चित्रीकरण थांबवण्यात येतं. नेमकं तसचं कही घडलं सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांतच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटासोबत.

कोविड- 19 मुळे रजनीकांतच्या चित्रपटाची शूटिंग थांबवावी लागली कारण चित्रपटातील चक्क 8 जण कोरोना पॉजिटीव्ह सापडले. या चित्रपटामुळे अभिनेता रजनीकांत, अभिनेत्री नयनतारा सोबत चेन्नईहून हैदराबादला रवाना झालेले. कारण ‘अनाथे’ची शूटिंग 29 डिसेंबर पर्यंत संपवायची होती. मात्र गेले काही महिन्यांपासून कोरोनामुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलावी लागली असता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणारे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!