राहुल वैद्यने सोडलं बिग बॉसचं घर

सलमान म्हणाला, ".. हे कारण देऊन शो सोडणारा तू पहिलाच स्पर्धक आहेस."

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व चर्चेत राहणारा रिअॅलिटी शोच्या बिग बॉसचे १४वे पर्व सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या चौदाव्या पर्वात अनेक नाट्यमय घडामोडी घडतायेत. काही दिवसांपूर्वी रुबिना दिलैकशी झालेल्या वादानंतर कविता कौशिकने बिग बॉसचं घर सोडलं. त्यानंतर रविवारी चार अंतिम स्पर्धकांची घोषणा होण्यापूर्वीच सलमान खानच्या बोलण्यावरून गायक राहुल वैद्यने घरातून काढता पाय घेतला.

वीकेंड का वार या एपिसोडमध्ये राहुल वैद्यने घरी परत जाण्यासाठी विनंती केली. मी माझ्या कुटुंबीयांपासून फार दिवस लांब नाही राहिलो. मी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम आहे पण कुटुंबीयांपासून लांब राहून मी जगू शकत नाही.वैतागून राहुल म्हणाला की बिग बॉसच्या घरात त्याचा जवळचा संबंध नसल्यामुळे तो खूप एकटेपणाचा अनुभव घेत होता. या शोमध्ये मला फारसा रस नसल्याने मी नीट खेळलो नाही हे मान्य करतो. मी हे मनापासून बोलतोय की, जे खरंच पात्र आहेत त्यांना बिग बॉसचं घर सोडावं लागू नये म्हणून मला या घरातून बाहेर जायचंय असं म्हणतं, राहुलने चाहत्यांची व निर्मात्यांची माफी मागितली.

त्याच्या या वक्तव्यानंतर सलमानने त्याला खडेबोल सुनावले. जर तू मनापासून हा खेळ खेळू शकत नाही तर तुझं या घरात राहणं व्यर्थ आहे. आम्ही तुला ऑफर दिली आणि ती तू स्वीकारली. तुला या शोमध्ये रस नव्हता म्हणून तू चुकीच्या व्यक्तींना वाचवलंस. घराची आठवण येत असल्यामुळे शो सोडणारा तू पहिला व्यक्ती असशील असं म्हणत सलमाननेही त्याचा निर्णय सांगितला. जनतेकडून राहुल वैद्यला घरात राहण्यासाठी पुरेशी मतं मिळाली होती. तरीसुद्धा तो बिग बॉसचं घर सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

हेही वाचा

कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!