प्रभासच्या ‘राधे श्याम’ने रचला नवा विक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा आगामी राधेश्याम हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आलाय . अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक, पोस्टर प्रदर्शित झालय.दिवसेंदिवस या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालीये. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकप्रिय ठरतोय .
अलिकडेच राधेश्यामचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरला तब्बल 25 मिलिअन व्ह्युज मिळालेत. हे पोस्टर खास प्रभासच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल. या पोस्टरला ‘बीट्स ऑफ राधेश्याम’ असंही म्हटलं जातय. विशेष म्हणजे केवळ चार दिवसांमध्ये 25 मिलिअन व्ह्युज मिळवून या चित्रपटाने इतिहास रचलाय.
‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणारे. यात प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारत आहे, तर पूजा प्रेरणा ही भूमिकेत दिसणारे.सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
हेही वाचा
- प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी
https://www.goanvartalive.com/other/kalamand/spl-song-on-punav-festival-marathi-video/
- ‘कुछ कुछ होता है’मधील क्यूट सरदार परजान दस्तूर लवकरच अडकणार लग्न बंधनात https://www.goanvartalive.com/other/kalamand/actor-parjan-dastur/