PHOTO STORY | पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी

पाहा 12 तासांच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद पटकावलं आहे. त्याचवेळी अरुणिताने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या गळ्यात पडली आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलं आहे. पवनदीपची खास गोष्ट म्हणजे तो एक चांगला गायक, तसंच संगीत कलाकार आहे. तो सर्व प्रकारची वाद्ये वाजवतो आणि या वाद्यांसह परफॉर्मन्सही देतो. अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, दानिश, निहाल आणि षण्मुखप्रिया यांनी पवनदीपसह शोच्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं होतं. त्यांच्या उत्कृष्ट गायनामुळे, पवनदीपला शो दरम्यानच काम देखील मिळालं. हिमेश रेशमियाच्या अल्बमसाठी त्याने दोन गाणी गायली आहेत. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. पवनदीप आणि अरुणिताची जोडी शोमध्ये खूप पसंत केली गेली होती. विशेष गोष्ट म्हणजे उत्तराखंडमधील एका रस्त्याचे नाव देखील आता पवनदीपच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. ‘इंडियन आयडॉल 12’चे हे काही खास फोटोज..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!