ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट

न्युमोनिया झाला असल्याची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन शाह यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालायत ऍडमिट करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन शाह हे न्युमोनियानं त्रस्त असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, आता नसिरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची सांगितलं जातंय.

मॅनेजरने काय सांगितलं?

सध्या नसिरुद्धीन शाह हे अंडर ऑब्जरवेशन आहेत. न्युमोनियाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांना एडमिट केल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारण होते आहे.

हेही वाचा : पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ रसिकांच्या भेटीला !

तब्बेतीवरुन अफवा

दरम्यान, इरफान खान आणि ऋषि कपून यांच्या निधनानंतर नसिरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीवरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अनेक अफवाही त्यांच्या प्रकृतीला घेऊन पसरल्या होत्या. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह यांनी या सगळ्या वृत्तावरुन स्पष्टीकरण देत सर्व चर्चा या निव्वळ वावड्या असल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा : …म्हणून त्या महिलेनं पुलावरुन मांडवीत उडी मारली होती!

कोण कोण आहे कुटुंबात?

70 वर्ष वय असणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुलंही आहे. सगळं कुटुंब सोबत राहतं. अनेक दर्जेदार सिनेमात केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी नसिरुद्दीन शाह प्रसिद्ध आहे. मासूम, त्रिदेव, सरफरोश, मकबूल, इकबाल, बनारस, द डर्टी पिक्चर, इश्किया, बेगम जान यासोबतच त्यांनी असंख्य सिनेमात लक्षात राहतील अशा भूमिका वठवलेल्यात.

हेही वाचा : दामोदर बनला न्हावी…

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!