त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता

हल्ल्यानंतर अभिनेत्री मालवीने केला धक्कादायक खुलास

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो: अभिनेत्री मालवी मल्होत्रावर वर्सोवा परिसरात एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केलाय. मालवीवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरूयेत. आरोपी योगेश महिपाल सिंहला माझ्या चेहऱ्यावर हल्ला करायचा होता, असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलाय.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालवीने सांगितलं, “कॅफेमधून मी घरी परतत असताना त्याने मला रस्त्यातच गाठलं. त्याने चाकूने माझ्या पोटावर वार केला आणि नंतर त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता. मी माझ्या हातांनी चेहरा झाकायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या उजव्या हातावर चाकूने वार केला.”

जानेवारी महिन्यात कामानिमित्त योगेशला दोन-तीन वेळा भेटल्याची कबुली मालवीने या मुलाखतीत दिलीये. त्यानंतर एका तामिळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उटीमध्ये दोघांची पुन्हा भेट झालेली. त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत असल्याचं तिने स्पष्ट केलंय. “तिसऱ्या भेटीदरम्यान त्याने मला प्रपोज केलं आणि लग्नाची मागणी घातली. मी फार नम्रतेने त्याला सांगितलं की हे शक्य नाही आणि त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत होते. मात्र त्यानंतर त्याने मला फुलं पाठवण्यास सुरुवात केली. कधी अचानक माझ्या बिल्डिंगखाली येऊन उभा राहायचा आणि तासनतास थांबायचा”, असही तिने सांगितलय.

लग्नास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने तीन वेळा हल्ला केल्याचा खुलासा मालवीने केलाय. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!