१९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा

'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटून गेली असली तरी सुद्धा आज चाहते ते तितक्याच आनंदाने पाहताना दिसतायेत. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे रेहना है तेरे दिल में. या चित्रपटाला नुकतीच १९ वर्षेपूर्ण झालीये. दरम्यान चित्रपटातील एका सीनविषयी चाहत्याने आर माधवनला प्रश्न विचारलाय . त्यावर आर माधवननं दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला ही हसू येईल.

ट्विटरवर एका यूजरने रेहना है तेरे दिल में या चित्रपटाती आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा समुद्र किनारी बसले असतानाच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘आर माधवन. रेहना है तेरे दिल में चित्रपट प्रदर्शित होऊन १९ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण ती साजरी करत आहोत. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते आज पर्यंत मी ही जागा मुंबईमध्ये कुठे आहे हे शोधतोय. कृपया ही जागा कुठे मला सांगा’ असे त्या यूजरने म्हटलेलं. तसंच हे ट्विट त्यानं आर माधवनला टॅग केलेलं.

या ट्विटवर आर माधवननं उत्तर देत ‘ही जागा दक्षिण अफ्रिकेमध्ये आहे’ असे म्हटलेयं. तसेच त्याने त्या सोबत हसण्याचे इमोजी देखील वापरलेत.

रेहना है तेरे दिल में या चित्रपटात आर. माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत दिसलेले. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरलेला. या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. तसेच या चित्रपटानंतर आर माधवनला मॅडी म्हणून लोकं ओळखतायेत . त्यावेळी दिया मिर्झा ही १९ वर्षांची असल्याचे म्हटलं जातं. तसंच ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘मिनाले’चा हिंदी रिमेक होता.

हेही वाचा

  • ‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’

https://www.goanvartalive.com/other/kalamand/kangana-ranaut-twitter/

  • मिर्झापूर – 2 वेबसीरिज येण्याआधीच पडू लागला मिम्सचा पाऊस

https://www.goanvartalive.com/other/kalamand/mirzapur-season-2-meme-started-already-marathi/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!