‘कोई मिल गया’ फेम अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन…

१९९७ मध्ये ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ या चित्रपटात भूमिका साकारणारे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. बुधवारी ३ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा:स्टेशनरी दुकानाआड व्हायची गुटखा व सिगारेटची विक्री, मात्र…

लखनऊमध्ये घेतला अखेरचा श्वास

गेल्या अनेक वर्षांपासून मिथिलेश हे हृदयरोगाशी झुंज देत होते. ३ ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांची ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी त्यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा:३१ मद्यपी चालकांना खाकीचा दणका, परवाने जप्त…

१९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण

मिथिलेश चतुर्वेदी यांनी १९९७ मध्ये ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकले. यात ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
हेही वाचा:मांडवी पुलावरुन उडी घेत एकाची आत्महत्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!