‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो – गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लग्नाची धामधूम सुरु असल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या भावाचा लग्नसोहळा होता त्यामुळे ती दररोज या सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. आता कंगनाच्या भावाचं लग्न झालं असून तिने नव्या वहिनीसाठी एक खास पोस्ट लिहिलाये. सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केलाय.
“करण आणि अंजलीला आशीर्वाद द्या. आज आमच्या घरी आमची मुलगी आलीये . पण जेव्हा अंजलीच्या आई-वडिलांचा विचार करते, त्यावेळी फार गहीवरुन येतं. आज त्यांचं घर रिकामं रिकामं झालं असेल. त्यांनी त्यांच्या काळजाचा एक तुकडा काढून आम्हाला दिलाय. आज त्यांच्या मुलीची खोली रिकामी झालीय. कन्यादानपेक्षा कोणतंच दान मोठं नाही”, असं कॅप्शन कंगनाने या व्हिडीओला दिलयं.
दरम्यान, यापूर्वीदेखील कंगनाने लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो शेअर केलेले. यामध्ये काही व्हिडीओंचादेखील समावेश होता. यामध्ये तिने भावाच्या हळदी समारंभाचा फोटो शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पारंपरिक पद्धतीने कंगनाच्या भावाचा हळदी सोहळा रंगल्याचं पाहायला मिळालाय.
-हेही वाचा
टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?