कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यरो: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु झालsला. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या दोघांमधील भांडण आता शिगेला पोहोचलं आहे. दरम्यान या भांडणात बॉलिवूड कलाकारांनी दिलजीतच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी बोलले होते तुला थकशील तू, आज तूला दिलजीतने पंजाबीमध्ये समजावलं. आता तरी त्याची माफी माग अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने कंगनावर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे प्रकाश राज यांनी “तू तर रॉकस्टार आहेस असं म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. सोबतच कुणाल कामरा, कुब्रा सैत, फराह खान, गिंपी गरेवाल, हिमांशी खुराना यांसारख्या अनेक कलाकांनी कंगनाची खिल्ली उडवत दिलजीतला पाठिंबा दिला. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.