केआरकेच्या टीकेची तोफ रविना टंडनच्या दिशेनं…

‘केआरकेला व्हायचंय मुलगी’; ट्विटमुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होतोय. तो नेहमीच चकित करणारी चित्रविचित्र वक्तव्य करतोय. अलिकडेच त्याने ट्विट करुन मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडिया वादावर केलेलं हे ट्विट सध्या जोरदार चर्चेत आलय.

“देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझा पुढचा जन्म एका सुंदर आणि चांगल्या मुलीच्या रुपात कर. कारण, त्यामुळे मला आयुष्यात कधीत कोणती मेहनत करावी लागलणार नाही”, असं ट्विट केआरकेने केलंय. विशेष म्हणजे त्याने हे ट्विट नेमकं कोणासाठी केलंय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलेला.

मात्र, केआरकेने आणखी एक नवीन ट्विट करुन त्यात अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा उल्लेख केलाय. त्यामुळे केआरकेने आता त्याच्या टीकेची तोफ रविना टंडनच्या दिशेने डागल्याचं दिसून येतय.केआरके ने केलेल्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय.

विविध विषयांवर कोणीही विचारलेलं नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मतं मांडतो. विशेष म्हणजे सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण, नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. मुलगी होण्याची इच्छा व्यक्त करणारा ट्विट सद्या फारच चर्चेत आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!