‘सिंघम’ची ‘काव्या’चं ठरलं! पाहा कोण आहे तो भाग्यवान

काजल अगरवाल ही दाक्षिणात्य व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. सिंघम चित्रपटातील काव्या या भूमिकेमुळं ती घराघरांत पोहोचली. एका उद्योगपतीशी ती लवकरच विवाहबंधनात अडकत आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ‘सिंघम’ चित्रपटातील ‘काव्या’ म्हणजेच अभिनेत्री काजल अगरवालनं (Kajal Aggarwal) लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली आहे. यासंबंधी तिनं नुकतंच ट्विट केलं असून 30 ऑक्टोबरला ती एका उद्योगपतीशी लग्न करणार आहे. काजलच्या या ट्विटवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा पाऊस पडून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतम किचलू (Gautam Kitchlu) असं या उद्योगपतीचं नाव आहे. मुंबईत एका छोटेखानी घरगुती समारंभात जवळचे नोतवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत काजल आणि गौतम सात फेरे घेतील. इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रातील एका नामांकित फर्मचा गौतम किचलू मालक आहे. अर्थात, काजलनं लग्नानंतरही चित्रपटात काम करणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळं तिच्या चाहत्यांचा हिरमोड होणार नाही.

हल्लीच ”इंडियन-2” चित्रपटाच्या शुटिंगवेळी क्रेन कोसळून झालेल्या अपघातातून काजल वाचली होती. यावेळी कमल हासनही (Kamal Haasan) उपस्थित होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जाण्यापूर्वी 2004मध्ये काजलनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तमिळ आणि तेलगू भाषकांत ती लोकप्रिय आहे. अजय देवगणसोबतचा ‘सिंघम’ चित्रपट तिच्या कारकिर्दीतील माइल स्टोन चित्रपट ठरला. बहुभाषिक असलेल्या काजलचं मुंबईत राहात असल्यानं मराठीसुद्धा पक्कं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!