आगामी मालिकेसाठी जुही परमार सज्ज

Goan Varta Live | प्रतिनिधी
‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुही परमार . कुमकुम या मालिकेमुळे जुही खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलीये. या मालिकेनंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. मात्र, आजही प्रेक्षक जुहीकडे कुमकुम म्हणूनच पाहतायेत . विशेष म्हणजे छोटा पडदा गाजवणारी ही अभिनेत्री लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेयं.
‘हमारीवाली गुड न्यूज’ या मालिकेच्या माध्यमातून जुही पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालीये. विशेष म्हणजे या मालिकेतून सासू-सुनेच्या नात्यावर भाष्य करण्यात आलय. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत जुहीने या मालिकेविषयी व तिच्या भूमिकेविषयी अनेक गोष्टी सांगितल्यायेत.
“साधारणपणे आजवर कोणत्याही मालिकेत सासू-सुनांचं एकमेकांशी फार चांगलं नात असल्याचं पाहायला मिळालेलं नाही. मात्र, या मालिकेत सासू-सुनेचं नातं थोडं वेगळं आहे, या मालिकेची कथा आणि संकल्पना मला विशेष आवडलीये. यापूर्वी कधीच सासू-सुनेचं असं नातं पाहायला मिळालं नाही आणि अशी भूमिकादेखील मी कधी केली नाहीये. त्यामुळे या मालिकेत मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे”.
दरम्यान, ‘हमारीवाली गुड न्यूज’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून सरोगसी आणि सरोगेट मदर यांच्यावर भाष्य करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.