आयकर विभागानं तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी केली…

सोनूचं मुंबईतील कार्यालय, हॉटेल आणि घरासह 6 ठिकाणांची आयकर विभागाकडून सर्व्हे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचं घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली. 

20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी

आयकर विभागानं तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी केली. सोनूचं मुंबईतील कार्यालय, हॉटेल आणि घरासह 6 ठिकाणांची आयकर विभागानं पाहणी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे सहा वाजता पाहणी सुरु केली होती. मात्र, आयकर विभागानं ही कारवाई का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

यकर विभागाच्या पाहणीबाबत सोनूकडून अद्याप माहिती नाही

सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, आयकर विभागाच्या या पाहणीबाबत सोनूनं अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. अशातच आयकर विभागानं पाहणी केल्यानंतर सोनूच्या घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. परंतु, या पाहणीदरम्यान, सोनू सूदच्या घर, कार्यालयातून आयकर विभागाच्या हाती नक्की काय लागलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

घर, कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाकडून पाहणी

अभिनेता  सोनू सूदच्या घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाकडून  पाहणी करण्यात आली. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, “सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात. पण विजय नेहमीच सत्याचा होतो. सोनू सूद यांच्यासोबत देशातील लाखो कुटुंबियांचे आशीर्वाद आहेत. ज्या कुटुंबियांना सोनू सूदनं अडचणींच्या काळात मदत केली.”

कोरोना प्रादुर्भावात सोनू सूद अनेकांसाठी ठरला देवदूत

दरम्यान, कोरोना प्रादुर्भावात सोनू सूद अनेकांसाठी देवदूत ठरला होता. सोनूनं अनेकांना सढळ हातानं मदत केली होती. त्यामुळे लोकांनीही सोनूवर भरभरून प्रेम केलं. तसेच कोरोना काळात आपापल्या घरी परतणाऱ्या मजुरांनाही सोनूनं आर्थिक मदत केली होती. तसेच मजुरांसाठी जेवण, बसची व्यवस्था यांसारख्या सोयीही पुरवल्या होत्या. यावरुन सोनू सुदवर कौतुकाचा वर्षावही केला जात होता. मात्र दुसरीकडे सोनूवर आरोपही केले गेले. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!