ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिका, श्रद्धा आणि साराचं नाव का आलं?

व्हॉट्सअप चॅटमुळे खरंच दीपिका आणि श्रद्धा कपूरचं नाव ड्रग्स कनेक्शनची जोडलं गेलं?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची चर्चा जोरात आहे. यात रकुल प्रीत सिंहनंतर दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंही नाव समोर आलं. ही नावं नेमकी कशी आणि कोणत्या कारणांमुळे पुढे आली, याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय. याचाच खुलासा नेमका झाला, तो व्हॉट्सअप चॅटमुळे. व्हॉट्सअप चॅटमुळे नेमकं काय घडलं, याचा आता तपास सुरु आहे. पण याची सुरुवात कशी झाली?

तीन दिग्गज अभिनेत्रींची नावं याप्रकरणात कशी पुढे आली?

ड्रग्सबाबतचे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नावं पुढे आली. त्यांना चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहेच. पण नेमकं हे सगळं पुढे कुठून आणि कसं आले, याची माहिती समोर आली आहे.

दीपिका पदुकोन – व्हॉट्सअपच्या एका ग्रूप चॅटमध्ये दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि सुशांत सिंह राजपूचा टॅलेंट मॅनेजर जया साहा यांच्यामध्ये २८ ऑक्टोबर २०१७ रोजी बातचीत झाली. यादिवशी झालेलं चॅट लीक झालंय. त्यात दीपिकाने हॅश आणि वीडसारख्या शब्दांचा वापर केल्याचा दावा केला जातोय. दीपिका करिश्माकडे ड्रग्सची मागणी करत असल्याचा बोललं जातंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीपिकाच या ग्रूपची एडमिन असल्याचाही दावा काही जणांनी केलाय.

सारा अली खान – रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीत सारा अली खानवर गंभीर आरोप केले होते. केदारनाथ सिनेमाच्या शुटींगवेळी सारा आणि सुशांत यांचे जवळचे संबंध होते. त्यावेळ झालेल्या सुशांतच्या ड्रग्सच्या पार्टीत साराही सहभागी झाली होती, असा दावा रियाने केल्याचं सांगितलं जातं. सोबतच सुशांच्या पावनामध्ये असलेल्या फार्म हाऊसमधील ड्रग्स पार्टीतही सारा आली होती, असंही बोललं जातं. तिथल्या बोटीवाल्यानंही याची कबुली दिली होती. महत्त्वाचं म्हणजे NCPलाही या फार्म हाऊसवर संशयास्पद गोष्टी आढळून आल्या होत्या.

श्रद्धा कपूर – जया साहा आणि श्रद्धा कपूर यांच्यामध्ये झालेलं एक चॅट समोर आलं आहे. यामध्ये श्रद्धा सीबीडी ऑईल मागत असल्याचं सांगितलं जातंय. ड्रग पॅडलर करमजीतने श्रद्धा कपूरला ड्रग्स घरी पोहोचवल्याचीही कबुली दिल्याचं बोललं जात आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नावं समोर आली आहे. आता या सगळ्या पार्ट्यांमध्ये आणखी कोण कोण होतं, हे अधिक तपासातून समोर येईल. त्यानंतर अनेक सेलिब्रेटींची चौकशी एसआयटी आणि एनसीबी कडून केली जाण्याची दाट शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!