अभिनेत्रीनं साडीवरच मारले पुशअप्स
व्यायाम करण्यासाठी जीमची गरज नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ती चक्क साडीवर पुशअप्स मारताना दिसते.
या व्हिडीओच्या माध्यमातून तिने व्यायाम करण्यासाठी आपल्या चाहत्यांना प्रेरित केलंय. कधीही, कुठेही, कुठल्याही कपड्यांवर तुम्ही व्यायाम करु शकता” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केलीये. अभिनेत्रीचा हा लक्षवेधी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
गुल पनाग ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असुन, २००३ साली ‘धुप’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. काही मालिकांमध्येही तीनं काम केलंय. अलिकडेच ती ‘द फॅमेली मॅन’ या वेब सीरिजमध्येही झळकली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.