‘बाहुबली’फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?

प्रभासचं पूर्ण नाव जाणून व्हाल थक्क

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: ‘बाहुबली’ चित्रपटामूळे रातोरात सुपरस्टार झालेला अभिनेता म्हणजे प्रभास .लोकप्रियतेचं शिखर गाठणारा अभिनेता म्हणुन प्रभास नावाजलेलाय. मुळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तुफान लोकप्रिय असलेला हा अभिनेता बाहुबलीमुळे सातासमुद्रापार लोकप्रिय झालाय. त्यामुळे त्याचे असंख्य चाहते असल्याचे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे प्रभास या नावाने लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचं खरं नाव फार कमी जणांना माहितीये.

काही काळापूर्वी एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या प्रभासनं त्याचं पूर्ण नाव सांगितल्याचं पाहायला मिळालंय. त्यानुसार, प्रभासचं पूर्ण नाव हे ‘व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती’ असल्याच त्याने उघड केलंय.

दरम्यान, प्रभास हा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने बाहुबली, साहो या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय.त्याचे पूर्ण नाव ऐकून त्याचे असंख्य चाहते थक्क झालेत.

  • हेही वाचा
  • १९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा

https://www.goanvartalive.com/other/kalamand/madhavan-gave-reply-to-fan-who-is-asking-about-shooting-place-in-rhtdm-movie/

  • ‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’

https://www.goanvartalive.com/other/kalamand/kangana-ranaut-twitter/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!