बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज

राणी मुखर्जीला सुपरस्टार करणारा अभिनेता आर्थिक टंचाईत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडतेय. यावेळी ती अभिनेता फराज खानमुळे चर्चेत आलीये . फराज सध्या बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. त्याला तीसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालंय. उपचारासाठी त्याला २५ लाख रुपयांची गरजये. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याला आर्थिक मदत करा, अशी विनंती पूजा भट्टने देशवासीयांना केलीय.

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेताये. 1996 साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केलीये. त्यांनंतर ‘पृथ्वी’, ‘मेहंदी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केललं. परंतु 2008 नंतर त्याला फारसं काम मिळलं नाही. त्याच दरम्यान त्याला कर्करोग देखील झालाय. परिणामी अभिनयापासून हळूहळू तो दूर होत गेला. सध्या बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा

‘कुछ कुछ होता है’मधील क्यूट सरदार परजान दस्तूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

https://www.goanvartalive.com/other/kalamand/actor-parjan-dastur/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!