अभिनेता फराज खानचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन झालेये. वयाच्या ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवलीये. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होतये.
अभिनेत्री पूजा भट्टने ‘मेहंदी’ चित्रपटातील अभिनेता फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिलीये. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे ट्विट पूजा भट्टने केलंय.
गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झालेलं. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती देशवासीयांना केलेली. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटलं जातं.
फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केलेली. त्यांनंतर त्याने ‘पृथ्वी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं काम केलंय. ‘मेहंदी’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत काम केलंय. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केले होते.
हेही वाचा
मुलांनी दिव्यांग विनिताचा आदर्श घ्यावा