गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती

लोकांमध्ये सायबर गुन्हेगारी बद्दल जागृती निर्माण करण्याची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर धक्कादायक बातम्या वाचायला मिळत असल्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांचे लक्षसुद्धा या प्रकारांकडे वळलेले दिसते. पण यातली मुख्य अडचण म्हणजे नेहमीचे गुन्हे किंवा हल्ले कसे घडतात याविषयी सगळ्यांना कल्पना असते; तशी सायबर विश्वाच्या बाबतीत मात्र ती नसते. म्हणजेच गुन्हेगारांच्या एखाद्या टोळीने बँकेवर हल्ला करणे अशा प्रसंगांची माहिती सर्वसामान्य लोकांना असते. पण इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे नक्की घडवता येतात तरी कसे आणि त्यांचे स्वरूप कसे असते हे समजून घेणे मात्र अनेकांना कठिन जाते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच त्यांना या संदर्भातली पुर्ण माहिती नसते आणि शिवाय या सगळ्या प्रकारांमधली गुंतागुंत इतकी क्लिष्ट असते की ती समजून घेणे सहजासहजी शक्य होत नाही. नेमक्या याच गोष्टीचा सायबर गुन्हेगार अनेकदा फायदा उठवताना दिसतात.

अशीच एक घटना घडली मुंबईतील एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीसोबत. बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांसाठी पटकथा लिहिणाऱ्या एका लेखकांने प्रियसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी अनेक लोकांसोबत आर्थिक फसवणूक केली अस उघडीस आलय.

बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांसाठी पटकथा लिहिणाऱ्या एका लेखकाला ऑनलाइन फसवणूकीच्या आरोपाखाली मुंबई पोलिंसानी अटक केलीये. शुभम पीताम्बर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव आहे. हा व्यक्ती आपल्या प्रियसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी इतर लोकांसोबत आर्थिक फसवणूक करत होता. परिणामी ओशिवरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. सध्या पोलीस या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करतायेत.

अलिकडेच त्याने मुंबईतील एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीसोबत फसवणूक केली. त्याने या कंपनीला खोटे मेसेज दाखवून जवळपास ३२ हजार रुपयांसाठी गंडवलय. या प्रकरणी कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. चौकशीदरम्यान अशा प्रकारे त्याने अनेकांसोबत फसवणूक केल्याची माहिती समोर आली.

लोकांमध्ये सायबर गुन्हेगारी बद्दल जागृती निर्माण करण्याची गरजे. सर्वसामान्य लोकांनीसुद्धा इंटरनेट वापरतानाचे धोके लक्षात घेऊन आपण या सायबर हल्ल्यांना बळी पडणार नाही यासाठीची काळजी घेतली पाहिजे. पण या सगळ्याकडे दुर्लक्षच केले जाते ही प्रचंड काळजीची गोष्ट आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!