शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मिती करत ते विविध पॉर्न एपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टीलाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं. तर कुटुंबियांनाही अनेक टीका सहन कराव्या लागल्या. अशातच शिल्पा शेट्टी आता पती राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतअसल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिल्पा आत्मनिर्भर, मुलांचं करू शकते संगोपन

एका मीडिया रिपोर्टनुसार, पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशातच शिल्पाच्या एका मित्राने तिच्या घरात सुरू असलेल्या काही खासगी निर्णयासंदर्भात मोठे खुलासे केले आहेत. शिल्पाच्या मित्राने सांगितलं की, पती राज कुंद्रा अशाप्रकारे काही अप्रामाणिक मार्गाने पैसे कमावत असल्याचा शिल्पाला अंदाजही नव्हता. त्यामुळे शिल्पाला आता पती राज कुंद्राने दिलेल्या भेटवस्तूंना हात लावण्याचीही इच्छा होत नाही. तो मित्र पुढे सांगतो की, शिल्पा आता आत्मनिर्भर असून ती आपल्या मुलांचं संगोपन करु शकते.

शिल्पा चित्रपटांमध्ये काम करण्यास इच्छुक

शिल्पाने इंडस्ट्रीतील आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितलं आहे की, ती ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’ चित्रपटांनंतर अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. अशातच दिग्दर्शक अनुराग बसु आणि प्रियदर्शन यांनी आगामी प्रोजेक्टमध्ये शिल्पा शेट्टीला रोल करण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिल्पाकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे येणार काळचं सांगू शकतो की, शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रापासून विभक्त होणार की नाही.

केलेल्या वक्तव्यांमुळे शिल्पा शेट्टी माध्यमांसमोर ट्रोल

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने माध्यमांसमोर येत केलेल्या वक्तव्यांमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. यात तिने सांगितले की, माझा पती राज कुंद्रा पॉर्न फिल्म नाही तर एरॉटिक कंटेंट असणाऱ्या फिल्म बनवतो. त्यामुळे तो निर्दोष आहे. तर काही दिवसांनी तिने पुन्हा एक पोस्ट करत मुलांच्या भविष्यासाठी वैयक्तिक आयुष्यावर टीप्पणी करु नका असं आवाहन केलं. या सर्व घडामोडींमध्ये शिल्पा शेट्टीने हातात असलेले सर्व प्रोजेक्ट थांबवल्याच्या बातम्या येत होत्या. तर ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मधूनही ती बाहेर पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने शोमध्य़े नव्याने एंट्री घेतली.

हा व्हिडिओ पहाः SAD STORY | VANARMARI | गोव्यातील वानरमारी समाजाची दाहकता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!